Breaking

Friday, 13 February 2026

फॅबटेक पॉलिटेक्निक च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात

 


सांगोला: प्रतिनिधी



फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी प्राचार्य तानाजी बुरूंगले यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

  मेळाव्याच्या सुरवातीस इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने उपस्थित पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील हिवाळी परीक्षा 2025 आणि चाचणी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर यांच्या हस्ते गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. यादरम्यान इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचा चालू  शैक्षणिक वर्षांचा आढावा विभाग प्रमुख प्रा. महेश वाळूजकर यांनी उपस्थित पालकांसमोर सादर केला.

  हा मेळावा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा संवाद व्हावा व आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगतीचा पालकांना माहिती व्हावी यासाठी आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्यात उपस्थित पालकांनी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती देणे, शिक्षणाबद्दल पालकांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हा होता. पालक मेळावा हा शिक्षक आणि पालकांमधील संवादाचा एक महत्त्वाचा दुवा असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी (शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक) एकत्रित प्रयत्न करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्यात अभ्यासातील प्रगती, आरोग्य, वर्गातील वर्तन आणि पालकांचे योगदान यावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी शिक्षकांकडून ग्वाही देण्यात आली.

   या मेळाव्याचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. गणेश शिंदे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.