Breaking

Friday, 6 February 2026

मतदान व मतमोजणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था

सांगोला/ प्रतिनिधी 



जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेतील मतदान व मतमोजणी शांततेत, निर्भय वातावरणात व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल तसेच गृह रक्षक दल सज्ज ठेवण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रे, वाहतूक मार्ग व महत्त्वाच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (ऊधडझ) - 02, पोलीस निरीक्षक (झख) - 01, सहाय्यक/पोलीस उपनिरीक्षक (-झख/झडख) - 14, पोलीस अमलदार - 230, यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाचा 01 प्लाटून व 300 गृह रक्षक सहभागी आहेत.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सतत गस्त, नाकाबंदी, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी तातडीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भक्कम सुरक्षा व्यवस्थेमुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.