Breaking

Saturday, 3 January 2026

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये सांगोला विद्यामंदिरमधील अक्षरा नवले,श्रेष्ठा माने व श्रीकृष्ण काटे द्वितीय

 


सांगोला/प्रतिनिधी ः 



53 वेतालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सांगोला येथील बहुउद्देशीय कन्या प्रशाला कडलास येथे नुकतेच संपन्न झाले.या प्रदर्शनात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोलामधील अक्षरा अजित नवले,श्रेष्ठा चिंतामणी माने हिने इयत्ता सहावी ते आठवी गटामधून व समर्थ श्रीकृष्ण काटे इयत्ता नववी ते बारावी गटामधून द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक उत्तम सरगर,काकासो नरूटे व शिक्षक उपस्थित होते.

यासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन विभागातील प्रा.पिंटू गुसाळे, उत्तम बेहेरे, सचिन बुंजकर, रोहिणी शिंदे,प्रशाला व ज्यु.कॉलेज मधील सर्व शास्त्र, गणित, पर्यावरण,भूगोल शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था उपाध्यक्ष ड विजयसिंह चव्हाण,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे ,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके , खजिनदार शंकरराव सावंत,संस्था कार्यकारिणी सदस्य शीला झपके,विश्‍वेश झपके ,सर्व संस्था सदस्य,पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.