Breaking

Monday, 22 December 2025

डेअरी डिप्लोमा कॉलेज कडलास येथे नॅचरल रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने पशु आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न

 


कडलास (वार्ताहर ) 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत डेअरी डिप्लोमा कॉलेज कडलास येथे नॅचरल रेडमीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने पशु आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ अतुल फुले सर यांनी कॉलेज बद्दल उपस्थित कंपनीच्या तज्ञांना कोर्स बद्दल माहिती देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर कंपनीच्या वतीने कंपनी बद्दल माहिती देऊन पशु आरोग्य सेवा संदर्भात उत्पादन करणारी अँटिबायोटिक औषधे व त्याचा परिणाम याबद्दल सविस्तर माहिती देऊन सदर कंपनीचे औषधी प्रॉडक्ट योग्य दरात सर्वत्र उपलब्ध आहेत   कंपनी स्वस्त दरात व उत्कृष्ट आरोग्य सेवा पशुपालकांना तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली पुरवते या संधीचा फायदा जास्तीत जास्त पशुपालकापर्यंत पोचवावा असे आव्हान अमोल रणदिवे साहेब व विशाल गायकवाड साहेब यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिंबक गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ वैशाली दबडे सौ सीमा धांडोरे श्री सनराज आहेरकर विकास गायकवाड यांनी प्रयत्न केले तर आभार प्रदर्शन प्रणित वाघमारे सर यांनी केले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना कंपनीच्या वतीने अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली