Breaking

Tuesday, 16 December 2025

सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे सांगोला येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन

 

सांगोला/प्रतिनिधी : 



सोलापूर जनता सहकारी बँक लि. सांगोला शाखेच्या वतीने बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्राहक मेळावा बुधवार, दि. 17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता आयोजित करण्यात आला असून, श्री. चौंडेश्‍वरी मंदिर, कोष्टी गल्ली, सांगोला येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या ग्राहक मेळाव्यास बँकेचे सभासद, खातेदार व हितचिंतकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. बँकेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजना तसेच आधुनिक बँकिंग सुविधांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.

सोलापूर जनता सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक नामांकित मल्टी-स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक असून महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये बँकेच्या 41 शाखा कार्यरत आहेत. मार्च 2025 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रु. 2978.14 कोटी असून, नफा रु. 24.40 कोटी इतका आहे. बँकेच्या एकूण ठेवी रु. 1904.15 कोटी व कर्जे रु. 1073.99 कोटी इतकी आहेत.

बँकेच्या सर्व ठेवीदारांना डीआयसीजीसी  अंतर्गत रु. 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येते. तसेच ग्राहकांसाठी लॉकर सुविधा, सीटीएस क्लिअरिंग, विविध ठेवी व कर्ज योजना उपलब्ध असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

ग्राहक मेळाव्यास सांगोला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष  श्री. सुनील पेंडसे, उपाध्यक्ष व संपर्क संचालक  श्री. अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी,  मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. विनय दुनाखे, पालक अधिकारी श्री. देवदत्त पटवर्धन तसेच  सर्व संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापक श्री. कैलास कांबळे सांगोला शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.