Breaking

Sunday, 16 November 2025

उद्योगपती बाळासाहेब आसबे यांचे भाचे सुप्रसिद्ध उद्योगपती प्रमोद वसंत घाडगे यांचा मा. आम. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

 

सांगोला/प्रतिनिधी : 



भारत आणि युरोपमधील यशस्वी विस्तारानंतर आता जागतिक स्वयंचलन बाजारात नवी उंची गाठत असलेल्या अनबॉक्स रोबोटिक्स कंपनीचे सर्वेसर्वा व नाथबाबा कन्स्ट्रक्शन चे मालक उद्योगपती बाळासाहेब आसबे यांचे भाचे सुप्रसिद्ध उद्योगपती प्रमोद वसंत घाडगे रा. एखतपूर व सध्या रा. पुणे यांचा सन्मान माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. उद्योग व्यवसायातून देशात आणि देशाबाहेर सांगोल्याच्या ग्रामीण भागाला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे मौलिक कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी कौतुक केले. 

यावेळी नाथबाबा कन्स्ट्रक्शन चे मालक उद्योगपती बाळासाहेब आसबे, व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.   णपलेु ठेलेींळली, पुण्यातील प्रगत स्वॉर्म-रोबोटिक्स आणि गोदाम स्वयंचलन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, ही प्रमोद घाडगे यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली एक इनोव्हेशन-केंद्रित संस्था आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन UnboxSort  एक उभ्या रचनेवर आधारित उच्च-गती रोबोटिक सॉर्टेशन सिस्टम - ई-कॉमर्स, रिटेल आणि 3झङ लॉजिस्टिक्स कंपन्यांना कमी जागेत अधिक उत्पादकता, जलद सॉर्टेशन आणि अचूक ऑपरेशन्स साध्य करून देते. Flipkart, DHL, Mondial Relay (InPost)  यांसारख्या अग्रणी ग्राहकांसोबत काम करत णपलेु ठेलेींळली भारत आणि युरोपमधील यशस्वी विस्तारानंतर आता जागतिक स्वयंचलन बाजारात नवी उंची गाठत आहे. यावरून निश्‍चितपणाने सांगोल्या सारख्या ग्रामीण भागातून स्वकर्तुत्वाने उद्योग उभा करून जागतिक उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. प्रमोद वसंत घाडगे यांच्या बाबतीत तरुणांनी आदर्श घ्यावा त्यांचे कार्य तालुक्यातील तरुणांना निश्‍चितपणाने प्रेरणा देईल. असा विश्‍वास व्यक्त करीत, प्रमोद घाडगे यांच्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून यामधून निश्‍चितपणे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. यासह तालुक्याचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचले आहे. यापुढे त्यांच्या कार्याला शुभेच्छा असल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.