Breaking

Wednesday, 8 October 2025

सांगोला नगरपालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

 भूसंपादन क्र 3 उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी आरक्षण सोडत केली जाहीर

सांगोला /प्रतिनिधी:





सांगोला नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवार दि.8 आक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे भूसंपादन अधिकारी क्र. 3 सोलापूर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपालिकचे मुख्याधिकारी डॉ. सुधिर गवळी यांनी सांगोला नगरपालिका प्रभागानुसार आरक्षण सोडत जाहीर केली. 

सांगोला नगरपालिकेसाठी 11 प्रभाग असून पहिल्या 10 प्रभागात प्रत्येकी 2 उमेदवार व 11 व्या प्रभागात 3 उमेदवार असे एकूण 23 उमेदवार संख्या नगरपालिका निवडणूकीतनिश्‍चित झाली आहे.

 नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी महिला उमेद्वार 12 व पुरुष उमेदवार 11 अशी संख्या निश्‍चित करण्यात आली आहे.

ओपन /सर्वसाधारण महिला उमेदवारांची संख्या 7 आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 3 महिला उमेदवार निश्‍चित करण्यात आले. अनुसुचित जातीसाठी 2 महिला उमेदवार निश्‍चित केले आहेत-

सर्वसाधारण/ खुल्या गटासाठी पुरुष उमेदवार संख्या 7 आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 3उमेदवार निश्‍चित केले आहेत. अनुसुचित जाती पुरुष उमेदवार 1 अशी उमेदवारी संख्या निश्‍चित केली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत आहे.या आरक्षण सोडतीसाठीविविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर, माजी नगराध्यक्ष- नगरसेवक, युवावर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सभागृहात उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लहान मुला-मुलींमार्फत चिठ्ठ्या उचलून जागांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडली 

आरक्षणाचा संक्षिप्त आढावा :

प्रभाग क्र. 1 -अ ) नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग (महिला), ब ) सर्वसाधारण

प्रभाग क्र. 2 - अ) अनुसूचित जाती, ब) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. 3 - अ)अनुसूचित जाती (महिला), ब ) सर्वसाधारण

प्रभाग क्र. 4 -अ) सर्वसाधारण (महिला),  ब ) सर्वसाधारण

प्रभाग क्र. 5 -अ) नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. 6 -अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला),  ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र. 7 -अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब ) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. 8 -अ) अनुसूचित जाती (महिला),ब ) सर्वसाधारण

प्रभाग क्र. 9 -अ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्र. 10 - अ ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण

प्रभाग क्र. 11 -अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), ब )सर्वसाधारण (महिला) क) सर्वसाधारण

असे आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे.या सोडतीनंतर सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगत अधिकच वाढणार असून, संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागातील आरक्षणानुसार प्रचाराची आखणी आणि तयारी सुरू केली आहे.

नगरपरिषदेतील या नव्या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणं आणि नव्या राजकीय जुळवाजुळवीची चिन्हं स्पष्टपणे दिसू लागली आहेत. येत्या काही दिवसांत निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.