वंचित बहुजन आघाडी सांगोला यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
सांगोला /प्रतिनिधी:
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रभर मुसळधार, अतिवृष्टी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे सांगोला तालुक्यातील शेतकर्यांचे शेतातील पिकांचे तसेच जनावरांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात या नुकसानाची झळ पोहचली आहे. गावोगावी आजही शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे डाळिंब, केळी, पेरू, शिमला मिरची यासह भाजीपाला पिके, खरीप पिकांचे पावसामुळे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्याला शासनाकडून आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने तालुक्यातील शेतकर्यांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी. शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची प्रशासनाकडून दक्षता घेण्यात यावी. तालुक्यातील सर्व मंडलमध्ये सरसकट पंचनामे करून मदत द्यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी शेतकर्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. अशा स्वरूपाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद उबाळे, महासचिव स्वप्नील सावंत, उपाध्यक्ष सुनील कांबळे, विनोदकुमार कसबे, कपिल बनसोडे, अक्षय कांबळे, सचिव दीपक होवाळ, संघटक समाधान होवाळ, वैभव काटे, आदी उपस्थित होते.
तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येते की, ज्या शेतकर्यांचे पंचनामे झाले नाहीत किंवा जे पंचनामे सुरू आहेत त्यात काही अडचणी असल्यास तशा शेतकर्यांनी आमच्याशी संपर्क साधावा :
तालुका अध्यक्ष विनोदभैया उबाळे
मो. नंबर 9767861414

