सांगोला/प्रतिनिधी ः
सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2026 रोजी वाणिज्य विभागाच्या वतीने विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स कार्निवल 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढवा, त्यांच्यामध्ये संघभावना निर्माण व्हावी, नेतृत्व गुण वाढावे यासाठी प्रश्नमंजुषा, पोस्टर प्रेझेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व प्रा. डॉ. राम पवार यांनी केले. या स्पर्धेमध्ये सुमारे 170 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सदाशिव देवकर व प्रा.सौ.सुरेखा गायकवाड यांनी केले. पी.पी.टी. प्रेझेंटेशन या स्पर्धेचे उद्घाटन संस्था निमंत्रित कार्यकारणी सदस्य मा. श्री सुरेश फुले यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही स्पर्धा कशी उपयुक्त आहे ते सांगितले या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. ओंकार घाडगे व प्रा. डॉ. जमीर तांबोळी यांनी केले.
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन प्रा. प्रशांत धनवे व प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. मालोजी जगताप व सौ विद्या पाटणे यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. प्रशांत धनवे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान जेवढे उपयुक्त आहे त्याचप्रमाणे तो सर्वगुणसंपन्न व्हावा असे वाटत असेल तर त्यांच्या कलागुणांना ही वाव मिळाला पाहिजे त्यांना सर्व क्षेत्रात काम करताना आत्मविश्वास त्याचबरोबर प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले पाहिजे हे सांगितले. संस्था सह सचिव साहेबराव ढेकळे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त आहेत त्यातून त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांनी व विभागाने अशा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गेले चार वर्षे अशा स्पर्धा घेत असल्या मुळे विभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वैष्णवी सुर्यागण यांनी केले, प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. सिमा मिसाळ यांनी मानले तर उपस्थिततांपैकी कु. सृष्टी खंडागळे, कु. वैष्णवी मोरे, कु.मयुरी सावंत, श्री जीवन व्हनमाने व श्री योगीराज थोरबोले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, प्रा. डॉ. रामचंद्र पवार, कार्यालयीन अधीक्षक विलास माने, विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्या जाधव, प्रा. समाधान माने, प्रा. सचिन सुरवसे, प्रा. प्राप्ती लामगुंडे व प्रा. निकिता लामगुंडे तसेच, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
