Breaking

Sunday, 12 October 2025

स्व. भाई. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावरील हल्ला निंदनीय.

 हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कडक करावी ः अ‍ॅड. सचिन देशमुख

सांगोला/प्रतिनिधी :




स्व. भाई. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी अज्ञात इसमांनी हल्ला केला. ही घटना निंदनीय असून हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो अश्या व्यक्तीवर कडक कारवाही करावी अशी मागणी      ड. सचिन देशमुख यांनी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याकडे केली आहे.

स्व. गणपतराव देशमुख संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक कृषीतुल्य नेतृत्व होते. तसेच आमच्यासाठी ते दैवत आहेत व यापुढे कायम राहणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी  जो हल्ला झाला  आहे. तो निंदनीय असून अशा घटनेंना किंवा अशा गोष्टींना आम्ही कदापीही  थारा देणार नाही. किंवा पाठीशी घालणार नाही असे मत    अ‍ॅड. सचिन देशमुख यांनी सांगितले.

पुढे बोलताना सचिन देशमुख म्हणाले हल्ला झाल्यानंतर उदयोगपती श्री. बाळासाहेब एरंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, उल्हास धायगुडे यांच्यासह आम्ही सांगोला पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची भेट घेऊन हल्लेखोरावर कडक कारवाई करावी अशी मागणी करून त्याना रॅली मधील ड्रोन फुटेज देऊन संपूर्ण सहकार्य केले पण काही लोक आम्ही भाजप मध्ये गेलो म्हणून आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न काही विरोधक करीत आहेत. परंतु त्याना उत्तर देण्याची ही वेळ नाही आमच्या टीम ने सध्या तालुक्याच्या विकासावर फोकस करून काम करण्याचे ठरवले आहे कदाचित,आमचे भाजप मध्ये जाणे या काही समाज कंटकांना आवडत नसेल त्यामुळे मला चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न चालू  केला आहे त्यामुळे आम्ही सांगोला पोलिसांना विनंती केली आहे की, हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या व्यक्ती वर कठोरात कठोर करावाई करावी व या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.