Breaking

Saturday, 18 October 2025

वकिली व्यवसायातून लोकशाहीला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे: ज्येष्ठ विधीज्ञ व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण

*विधिज्ञ संघ सांगोला यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या तैलचित्राचे सांगोला विधीज्ञ संघात मान्यवरांच्या हस्ते अनावरण 

सांगोला /प्रतिनिधी: 



 विधीज्ञ संघ सांगोला यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या तैल चित्राचे सांगोला विधीज्ञ संघात मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वकिलांनी आपल्या माणसाला न्याय दिला पाहिजे. अन्यायाविरोधात लढा देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या व्यवसायाला न्याय देण्याची भूमिका आपण सातत्याने ठेवली पाहिजे. वकीली व्यवसायातून लोकांची सेवा झाली पाहिजे. भारतीय लोकशाही जगात श्रेष्ठ ठरली आहे. संविधान हे प्रत्येकाने वाचले पाहिजे. ते सर्वांसाठी सक्तीचे केले पाहिजे. लोकशाहीला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे . आपण वकिली पदवी कशी मिळवली यापेक्षा मिळवलेल्या पदवीच्याद्वारे आपण जनतेची कशी सेवा करतो हे पाहिले पाहिजे. वकिली व्यवसायात आपण काम किती व कसे करतो याला महत्त्व आहे असे विचार सांगोला नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व सांगोला विधीज्ञ संघाचे माजी ज्येष्ठ विधीज्ञ पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सांगोला न्यायालयातील प्रमुख दिवाणी न्यायाधीश पी. आर .कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश ए.ए. पाटील , सह दिवाणी न्यायाधीश एस.एस. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे हे होते. 
            या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद थोबडे तसेच विविज्ञ संघ सांगोलाचे विद्यमान अध्यक्ष मारुती ढाळे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे म्हणाले, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सहा जिल्ह्यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ उभे करण्याचा निर्णय घेतला. तरुण वकिलांनी व स्थानिक वकिलांनी आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यांच्या अडचणी काय आहेत हे आपण समजावून घेतल्या पाहिजेत. सांगोला व सोलापूर येथील वकिलांनी सक्षमपणे काम करून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. 
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मारुती ढाळे म्हणाले, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर येथे सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ स्थापन करण्यासाठी मान्यता दिली. विधीज्ञ संघामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचे तैलचित्र लावण्यात आले. हा खरा आनंदायी क्षण आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष मारुती ढाळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व विधीज्ञ संघाने सहमती दिली. सर न्यायाधीश भूषण गवई यांचा फोटो विधीज्ञ संघात लावण्याचा हा पहिला कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ॲड. एस. पी .कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. जी. एल. भाकरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विधीज्ञ, मान्यवर तसेच माजी नगरसेवक व डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सतीश‌भाऊ सावंत उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. समाधान दिवसे यांनी केले. 



One attachment  •  Scanned by Gmail