सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे स्पार्क या भितीपत्रकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मा.ड. उदय(बापू घोंगडे) हे उपस्थित होते. तसेच इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. शामराव नवले उपस्थित होते. या भितीपत्रकात महिला सक्षमीकरण या विषयावरती कु. तेजल शेळके या विद्यार्थिनीने लेखन केले. याप्रसंगी डॉ. भाग्यश्री पाटील यांनी प्रकाशनाबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.प्रज्ञा उबाळे, प्रा.सुरेखा गायकवाड व प्रा.परमेश्वर थोरबोले यांनी केले. यावेळी वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ.विद्या जाधव, डॉ.चित्रा जांभळे, डॉ.सदाशिव देवकर व डॉ. जमीर तांबोळी हे उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
